नांदेड : गुंटूर ता. कंधार येथील रहिवासी भास्करराव अमृतराव कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. गुंटूर आणि परिसरात ते मनमिळाऊ व्यक्ती म्हणून परिचित होते.
विविध धार्मिक कार्यक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पंतवंडे, पाच बहिणी असा मोठा परिवार आहे.
नांदेड येथील संजय गुरू गुंटूरकर आणि पंचायत समिती लोहा अंतर्गत बोरगाव जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक संतोष कुलकर्णी यांचे ते वडील होत.