सुनंदा पवार यांचे मत ः वाघळवाडी येथे महिलांना मार्गदर्शन
वाघळवाडी -आई होणे सोपे, पण पालक होणं अवघड आहे, असे मत ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.
वाघळवाडी-सोमेश्वरनगर ग्रामपंचायतच्या वतीने महिला मार्गदर्शन व हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला होता. त्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुनंदा पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती नीता बारवकर होत्या. सुरूवातीला जिजामाता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन त्यांच्या हस्ते पार पडले.
सुनंदा पवार यांनी मार्गदर्शन करताना, घरातील मुलामुलींवर लैंगिक शोषण, अत्याचार त्या संबंधित आईने महिला म्हणून कशी काळजी व सावधानता बाळगावी, आपल्याला मुलामुलींना शिक्षण द्यावे, बालविवाहमुळे होणारे मुलीच्या आयुष्याचे नुकसान याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले.
ग्रामपंचायतमार्फत प्लॅस्टिक बंदीबाबत प्रयत्न होत आहेत. डब्यांची पिशवी व महिलांना हिमोग्लोबिन वाढीसाठी शेंगदाणा चिक्कीचे वाटप केले. गावातील 650 ते 700 एवढ्या बहुसंख्य महिलांना उपस्थित राहिल्याबद्दल गावच्या सरपंच नंदा सकुंडे व सर्व सदस्यांचे सुनंदा पवार यांनी अभिनंदन केले.
सरपंच नंदा सकुंडे म्हणाल्या, ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी विविध उपक्रम राबवलेजात आहेत. ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ला सर्व बचतगट व महिला यांना जोडण्यात यावे व त्यांना योग्य रितीने मार्गदर्शन मिळावे, असे आवाहन सकुंडे यांनी पवार यांना केले.
पद्मजा प्रमोद काकडे, पंचायत समिती सदस्या नीता फरांदे, मेनका मगर, होळच्या सरपंच स्नेहा गिते, चोपडजच्या सरपंच अश्विनी गाडेकर, वाणेवाडीच्या सरपंच दीपाली जगताप, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, ग्रामपंचायत सदस्या शीला सावंत, सुरेखा सावंत, लता शिंदे, श्रद्धा भुजबळ, शाबेराबी पठाण, ज्योती करावे, पांडुरंग भोसले, हेमंत गायकवाड, ग्रामसेवक सुभाष चौधर, तुषार सकुंडे, पप्पू कायंगुडे आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रद्धा भुजबळ यांनी केले. मनिषा सकुंडे यांनी आभार मानले.