– राजेंद्र वाघमारे
नेवासा – नेवासा फाटा येथे अल्पवयीन मुले-मुली भिक मागण्यासाठी दररोज रस्त्यावर येवून दयामया करत पैसे मागत फिरतांना दिसून येतात आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आंबेडकर चौकात नेवासाला जाण्यासाठी एक महिला प्रवासी वाहतुक करणाऱ्या गाडीत बसलेली असतांना ही भिक मागणारी लहान मुलांची टोळी या महिलेला भिक मागून पैसेची मागणी करु लागले.
प्रवासी महिलेने पैसे न दिल्यामुळे भिक मागणारी चिमुरडी मुले या महिलेच्या पाया पडू लागली तरीही या प्रवासी महिलेने पैसे न दिल्यामुळे भिक मागणाऱ्या चिमुरड्या मुलांनी वाईट शिवीगाळ केली. त्यामुळे या महिलाचा अपमान झाल्यामुळे या महिलेनेही या मुलांना चांगलेच सुनावले हा प्रकार सुरु असतांना भिक मागणाऱ्या टोळीतील महिला-पुरुष घटनास्थळी चौकात दाखल होवून भिक न देणाऱ्या महिलेला चांगलीच धक्काबुक्की केल्याचा प्रताप आंबेडकर चौकात घडल्याने बघ्यांची एकच गर्दी जमली.
हाकनाक प्रवाश्यांसह व्यवसायिकांना या भिकणाऱ्यांचे सोंग घेवून पैसे मागण्यासाठी सोडले जात असल्यामुळे प्रवासी वर्गाला याचा मोठा ञास सहन करण्याची वेळ सर्वसामान्यांवर येवून विनाकारण अपमानित होण्याच्या घटना समोर येत असल्याचा प्रकार शनिवारी घडल्यामुळे आता तरी भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून होवू लागली आहे.
नेवासा फाटा येथील राजमुद्रा आणि आंबेडकर चौकात भिक मागण्यासाठी परिसरातील बालके रस्त्यावर फिरुन व्यावसायिकांसह प्रवाश्यांना दररोज वैताग देतांना दिसून येत आहे आठ – दहा वर्षाच्या वयातील ही मुले जाणीवपुर्वक रस्त्यावर पाठवली जातात ही मुले भिक घेण्सासाठी प्रवाशांच्या मागेच लागत असून,
जर पैसे दिले नाही तर शिव्याही देत असल्याच्या घटना घडतात मग ‘त्या’ भिकाऱ्यांची मोठी माणसे रस्त्यावर येवून हाणामाऱ्या पर्यंत मजल मारत असल्यामुळे या भिकाऱ्यांच्या उपद्व्यापातून सर्वसामान्य प्रवाशांची सुटका होण्यासाठी पोलीसांसह ग्रामपंचायतीने भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही जानतेतून व्यक्त केली जात आहे.