शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींचे महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन

नवी दिल्ली –लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे.या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधीची तयारी राष्ट्रपती भवनात जोरात सुरू असून, नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली नसतील व अमित शहा यांचा मात्र समावेश होईल आणि त्यांना अर्थमंत्रिपद मिळू शकेल.

दरम्यान, शपथविधीपूर्वी मोदींनी आज शहिदांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळालाही अभिवादन केले. नरेंद्र मोदीसर्वप्रथम राजघाटवर पोहोचले. महात्मा गांधीजींना राजघाटवर नमन केल्यानंतर अटलजींना अभिवादन करण्यासाठी मोदी अटलजींच्या समाधीस्थळाकडे रवाना झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाध्यक्षअमित शहादेखील उपस्थित होते.

 

आज शपथविधी सोहळ्याला सुमारे 8 हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आदी विरोधी पक्षनेत्यांबरोबरच बिमस्टेक देशांचे प्रमुख, उद्योगपती, चित्रपट तारे, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल. शपथविधी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यात मॅरेथॉन बैठक झाली. त्या बैठकीत मंत्रिमंडळ रचनेला अंतिम रूप देण्यात आल्याचे समजते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)