बेंगळुरू – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ‘गगनयान’ मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ‘व्योमित्र’ नावाचा रोबोट अर्थात यंत्रमानव अवकाशात पाठवणार आहे. या रोबोटला महिला अंतराळवीराचा आकार देण्यात आला आहे. मुख्य गगनयान मिशन पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये पाठवले जाईल. यामध्ये तीन अंतराळवीरांना तीन दिवस पृथ्वीपासून 4 हजार किमी उंचीवर पाठवले जाईल.
विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत आपल्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेच्या तयारीत व्यस्त आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) संस्कृत शब्द व्योम (स्पेस) आणि मित्रा एकत्र करून रोबोटचे नाव दिले आहे. ते अंतराळवीरांप्रमाणेच पाठवले जाईल. त्याचे काम मानकांनुसार मिशनच्या कामगिरीवर लक्ष ठेवणे, हे असेल. काही त्रुटी आढळल्यास रोबोट चेतावणी देईल. यामुळे मुख्य मोहिमेत अंतराळवीरांचे जीवन सुरक्षित ठेवण्यास मदत होईल.
डॉ.सिंग म्हणाले, व्योमित्र रोबोटमध्ये सहा पॅनल चालविण्याची क्षमता आहे. हे मिशन मानवांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात मदत करेल. लाइफ सपोर्ट सिस्टीम देखील सुधारण्याबाबत चाचण्या या मिशनमध्ये घेतल्या जातील. यापूर्वी इस्रोने चाचणी वाहन उड्डाणाची चाचणी घेण्यासाठी २१ ऑक्टोबर रोजी टीव्ही डी-1 ची चाचणी केली होती. ही चाचनीही यशस्वी झाली होती.