नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी वाराणसीतील रस्ते पिण्याच्या पाण्याने धुतले

रस्ते धुण्यासाठी १ लाख ४० हजार लिटर पाण्याचा वापर

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान मोदींनी मोठा रोड शो केला. वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी शहरातील रस्ते धुवून काढण्यात आले. मात्र वाराणसीत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण असताना. रस्ते धुण्यासाठी १ लाख ४० हजार लिटर पिण्याचे पाणी वापरण्यात आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

वाराणसी महापालिकेने मोदी शहरात येण्याच्या आदल्या रात्री पाण्याचे ४० टॅँक आणि ४०० कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील सर्व रस्ते चकाचक केले. मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी वाराणसीमध्ये भव्य रोड शो केला.

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून पंतप्रधान मोदींच्या प्रचारासभांचा धडका पाहायला मिळत आहे.
आज पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यादरम्यान, पंतप्रधान मोदींसोबत जदयुचे अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांच्यासहीत एनडीएतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.