pune news : उसने दिलेले पैसे परत मागितल्याचा रागातून लोखंडी विळी, लाकडी दांडके, लोखंडी फुकणीने मारहाण करणाऱ्या सोमनाथ कुंभार आणि त्याच्या साथीदारावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९२ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख सोमनाथ अशोक कुंभार (वय-२८, टेल्को कॉलनी, आंबेगाव-खुर्द), रोहित दिलीप पाटेकर (वय-२०, गणेश चौक, धनकवडी) अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कुंभार आणि पाटेकर दोघेही येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
फिर्यादी यांचे वडील उसने दिलेले १० हजार परत मागणीसाठी १६ सप्टेंबर २०२३ रोजी गेले असता सोमनाथ कुंभार आणि रोहित पाटेकर यांच्याकडे गेले असता लोखंडी विळी, लाकडी दांडके लोखंडी फुकणीने मारहाण करून गंभीर जखमी जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला. यानंतर आरोपी कुंभार लोखंडी फुकनी घेऊन फिर्यादी यांना मारहाण करण्यासाठी आला होता. या संदर्भात फिर्यादी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली दिली होती.
सोमनाथ कुंभार आणि रोहित पाटेकर विरुद्घ मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी तयार केला होता. परिमंडळ 2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्फत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्याकडे सादर केला. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगांवकर करत आहेत