आळंदी, – (एम.डी. पाखरे/ ज्ञानेश्वर फड)
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ।। १।।
धन्य भागिरथी मनकर्णिका वोघा । आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ।।२।।
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग । मिळालें तें सांग अलंकापुरी ।।३।।
नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत । झाला पहा एकांत ज्ञानोबाचा ।।४।।
सर्व वारकरी भाविक भक्तांना आता आळंदीच्या कार्तिकी एकादशीची आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची ओढ लागली आहे. दरवर्षी लाखो वारकरी भाविक हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवत असतात. यावर्षी येत्या 5 डिसेंबरपासून माऊलींचा संजीवन समाधी सोहळा सुरु होत आहे. 9 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 11 तारखेला माऊलींचा 727वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान, माऊली मंदिरात होणाऱ्या परंपरेच्या कार्यक्रमाची पत्रिका जाहीर झाली आहे.
मंगळवारी दि. 5 डिसेंबर सकाळी 7 ते 9 या वेळेत ह.भ.प. बाळासाहेब पवार, हैबतबाबा वंशज,प्रतिनिधी यांच्यातर्फे हैबतबाबांच्या पायरीचे पूजन होऊन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर शनिवारी 9 डिसेंबरला कार्तिकी एकादशी अर्थात आळंदीची यात्रा आहे. यादिवशी रात्री साडेबारा ते पहाटे 2 या वेळेत 11 ब्रम्हवृंदांच्या वेदघोषात माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक व दुधारती होईल. यावेळी दर्शनरांगेत उभे असलेल्या पहिल्या दाम्पत्याला या महापूजेचा मान दिला जातो. दुपारी 1 वाजता पालखी प्रदक्षिणा केली जाईल. रविवारी 10 डिसेंबरला पहाटे साडेतीन ते चार या वेळेत खेडचे प्रांतअधिकारी यांच्या हस्ते पंचोपचार पूजा होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 ते सायंकाळी 7 यावेळेत रथ मिरवणूक अर्थात रथोत्सोव होईल. मंदिराच्या गाभाऱ्यात रात्री 11 ते 12 यादरम्यान, खिरापत पूजा, फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप होणार आहे. सोमवारी 11 डिसेंबरला माऊलींचा 726वा संजीवन समाधी सोहळा उत्सव पार पडणार आहे. या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 12 यावेळेत परंपरेप्रमाणे हरी भक्त परायण नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल. दुपारी 12 ते साडेबारा या वेळेत संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त घंटानाद, पुष्पवृष्टी, आरती आणि मान्यवरांना नारळप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. मंगळवारी 12 डिसेंबरला रात्री साडेनऊ ते साडेबारा या वेळेत श्रींचा छबीना मिरवणूक होणार आहे.
तसेच या सर्व सोहळ्यादरम्यान, 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधित माऊली मंदिरात दररोज पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, महानैवेद्य, कीर्तन, धुपारती, जागर असे धार्मिक कार्यक्रम परंपरेने वेळेनुसार होणार आहेत.
**कार्तिक वद्य अष्टमी ते चतुर्दशी/अमावस्या मंदिरातील कार्यक्रम**
कार्तिक वद्य अष्टमी, मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी 5 ते 11:30 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, सकाळी 7 ते 9 हभप बाळासाहेब पवार हैबतरावबाबा वंशज /प्रतिनिधी यांच्या तर्फे वै.ह भ प हैबतबाबा पायरी पूजा. दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य, सायंकाळी 6 ते 8 वाजता वीणा मंडपात ह भ प योगीराज ठाकूर यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री 8 ते 8:30 धुपारती, रात्री 9 ते 11 वीणा मंडपात ह भ प बाबासाहेब आजरेकर यांचे तर्फे कीर्तन सेवा. रात्री 10 ते 12 हैबतबाबा पायरीच्या पुढे ह.भ.प. वासकर महाराज, 12 ते 2 मारुतीबुवा कराडकर, रात्री 2 ते 4 ह. भ. प. हैबतबाबा आरफळकर यांचेतर्फे जागर सेवा.
कार्तिक वद्य नवमी, बुधवार दिनांक 6 डिसेंबर रोजी पहाटे 3 ते 5 पवमान, अभिषेक व दुधारती, पहाटे 5 ते सकाळी 11:30 वाजेपर्यंत श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य, सायंकाळी 6:30 ते 8:30 वीणा मंडपात ह भ प बाबासाहेब देहूकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री 8:30 ते 9 धुपारती,रात्री 9:30 ते 11 वा. वीणा मंडपात हभप वासकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा.
कार्तिक वद्य दशमी, गुरुवार दिनांक 7 रोजी पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी 5 ते 11:30 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य, सायं. 4:30 ते 6:30 वा. हभप गंगुकाका शिरवळकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा, सायंकाळी 6:30 ते 8:30वा. वीणा मंडपामध्ये धोंडोपंत दादा अत्रे यांच्या तर्फे कीर्तन सेवा, रात्री 9 ते 11 श्रींची पालखी मंदिर प्रदक्षिणा, रात्री 9 ते 11 हभप वासकर महाराज कीर्तन सेवा (वीणा मंडप), रात्री 11 ते 11:30 धुपारती, रात्री 11:30 ते 12:30 हभप वाल्हेकर महाराज यांचेतर्फे जागर.
कार्तिक वद्य दशमी (शुक्रवार स्मार्त एकादशी) दि. 8 रोजी पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी 5 ते 11:30 श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य, सायंकाळी 4:30 ते 6:30 वीणा मंडपामध्ये ह भ प गंगुकाका शिरवळकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा. 6:30 ते 8:30वा. धोंडोपंत दादा अत्रे यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री 8:30 ते 9 धुपारती, रात्री 9 ते 11 वीणा मंडपात हभप वासकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. रात्री 11:30 ते 12:30 वीणा मंडपात वाल्हेकर महाराज यांचेतर्फे जागर.
कार्तिक वद्य द्वादशी, भागवत एकादशी (कार्तिकी एकादशी यात्रा) शनिवार दिनांक 9 रोजी रात्री 12:30 ते पहाटे 2 11 ब्रम्हवृंदांच्या वेद घोषात पवमान अभिषेक व दुधारती, दुपारी 12 ते 12:30 महानैवेद्य, दुपारी 1 वाजता श्रींची नगर प्रदक्षिणा, रात्री 8:30 धुपारती, रात्री 12 ते 2 श्री मोझे यांचेतर्फे जागर.
कार्तिक वद्य द्वादशी, वार रविवार दिनांक 10 रोजी पहाटे 2 ते 3:30 पवमान अभिषेक व दुधारती, पहाटे 3:30 ते 4 प्रांतअधिकारी खेड यांचे हस्ते पंचोपचार पूजा. पहाटे 3 ते 6 मुक्ताई मंडपात नांदेडकर मंडळींची दिंडी क्र.15 यांचेतर्फे काकडा भजन सेवा. सकाळी 5 ते 11:30 श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य, दुपारी 4 ते 7 रथोत्सव संपन्न होणार आहे. दुपारी 4 ते 6 वीणा मंडपात ह भ प हरिभाऊ बडवे यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री 9 ते 11 वीणा मंडपात ह भ प केंदूरकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री 11 ते 12 पास धारक, खिरापत पूजा, प्रसाद वाटप- वीणा मंडप, श्रींच्या गाभाऱ्यात फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप.
कार्तिक वद्य 13/14 त्रयोदशी वार सोमवार दिनांक 11 रोजी पहाटे 3 ते 4 पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी 5 ते 9: 30 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, सकाळी 7ते 9 हैबतबाबा पायरी पुढे ह भ प हैबतबाबा आरफळकर यांचे तर्फे कीर्तन, सकाळी 7 ते 9 विणा मंडपामध्ये कीर्तन, सकाळी 7 ते 9 भोजलींग काका मंडप येथे दाणेवाले निकम दिंडी यांचे कीर्तन, सकाळी 9 ते 12 ह भ प नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन, दुपारी 12 ते 12:30 726 वा संजीवन समाधी दिनानिमित्ताने घंटा नाद ,पुष्पवृष्टी व आरती मान्यवरांना नारळ प्रसाद, दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य, सायंकाळी 6:30 ते 8:30 विणा मंडपात ह भ प सोपान काका देहूकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा, रात्री 8:30 ते 9 धुपारती, रात्री 9:30 ते 11:30 कारंजा मंडपा मध्ये हरिभाऊ बागडे व पंढरी केसरकर यांचेतर्फे भजन, रात्री 12 ते 4 हैबतरावबाबा आरफळकर यांचेतर्फे जागर.
कार्तिक आमावस्या मंगळवार दि.12 रोजी पहाटे 3 ते 5 पवमानपूजा, दुधारती. सकाळी 5 ते 11 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य, दुपारी 4 ते 6 श्री मोझे यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री 8 ते 8:30 धुपारती, रात्री 9:30 ते 12:30 श्रींचा छबिना, रात्री 12:30 शेजारती संपन्न होणार आहे.