मुंबई :- जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या बीसीसीआयने काही हजार कोटींचा आयकर भरला आहे. बीसीसीआयला आयपीएल स्पर्धेच्या माध्यम हक्कांच्या विक्रीतून तसेच ओटीटी हक्कांच्या विक्रीतून बीसीसीआयने जवळपास 50 हजार कोटी कमावले आहेत.
बीसीसीआयने 2021-22 या आर्थिक वर्षात 1 हजार 159 कोटी रुपये आयकर भरला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षापेक्षा ही रक्कम तब्बल 37 टक्क्यांनी जास्त आहे.
बीसीसीआय भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेद्वारेही हजारो कोटी रुपये मिळवणार आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा माध्यम हक्कांची विक्री एका लिलावाद्वारे करण्याचे निश्चित केले आहे.
गेल्यावेळी झालेल्या लिलावात डिस्ने-स्टारने 103 सामन्यांसाठी 6138.10 कोटी रुपये बीसीसीआयला दिले होते. डिस्ने-स्टार एका सामन्यासाठी जवळपास 61 कोटी रुपये बीसीसीआयला देत होते.