नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशमध्ये डोळ्यांची साथ झपाट्याने पसरत असून एकट्या हमीरपूर जिल्ह्यात संक्रमित रुग्णांची संख्या 2,500च्या वर गेली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हमीरपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. अग्निहोत्री म्हणाले, हमीरपूर जिल्ह्यात गुरुवारपर्यंत डोळ्यांचा फ्लूच्या रुग्णांची संख्या 2,609वर पोहोचली आहे. यात डोळ्यांच्या फ्लूचा सर्वाधिक धोका मुलांमध्ये दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने शाळा आणि महाविद्यालयांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संक्रमित विद्यार्थी शाळेत किंवा महाविद्यालयात येणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
हमीरपूरमधील बडसर परिसरात याचा सर्वाधिक प्रार्दुभाव दिसून येत आहे. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संक्रमित लोकांची संख्या 900 पर्यंत वाढली आहे, जे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सदस्यांमध्ये संसर्ग वाढल्याच्या अहवालानंतर 15 ऑगस्टपर्यंत ऑफलाइन अभ्यासासाठी बंद करण्यात आले आहे.
एनआयटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, विद्यार्थ्यांना बाहेर न पडण्याचा आणि त्यांच्या वसतिगृहात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.दरम्यान, येथील एका खासगी निवासी शाळेत डोळ्यांच्या फ्लूच्या रुग्णांची संख्या सुमारे 250वर पोहोचली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बिलासपूर, उना, सिरमौर आणि इतर जिल्ह्यांतूनही शेकडो डोळ्यांच्या फ्लूच्या रुग्णांची नोंद होत आहे.