बर्लिन : बायर्न म्युनिकने स्वप्नवत कामगिरी करताना जर्मन करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकली. त्यांचे या स्पर्धेच्या इतिहासातील विक्रमी 20 वे विजेतेपद ठरले. अंतिम सामन्यात बायर्नने बायर लेव्हरक्युसेन संघाचा 4-2 असा पराभव केला.
या सामन्यात रॉबर्ट लेवानडोस्कीने आपले या स्पर्धेतील सातत्य कायम राखताना 2 गोल केले. त्याला सुरेख साथ देताना डेव्हिड अल्बा आणि सर्जी नाब्री यांनी प्रत्येकी एक गोल केला. लेवानडोस्कीने यंदाच्या मोसमात गोलचे अर्धशतक साकार केला. बायर्नचे हे जर्मन लीगचे 20 वे विजेतेपद ठरले. आता ऑगस्टमध्ये चॅम्पियन्स लीग स्पर्धा होत असून त्यातही विजेतेपद मिळवून यंदाच्या मोसमात विजेतेपदांची हॅट्ट्रिक करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.