म्युनिक – चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बायर्न म्युनिकने बलाढ्य चेल्सीवर 4-1 अशा विजयाची नोंद केली व स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या हाफमध्ये जर दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत तर आघाडीवर असलेल्या संघाला ऍग्रीगेट गुण मिळतात. याच नियमाच्या आधारे बायर्नला 7-1 असे विजयी घोषित करण्यात आले.
पोलंडचा स्ट्रायकर रॉबर्ट लेवेनोवस्की याने दोन गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने या संपूर्ण स्पर्धेत आपल्या खेळाच्या जोरावर संघाला सातत्याने यश मिळवून दिले आहे. युरोपमधील ही सर्वात मानाची स्पर्धा आली तरीही सध्या करोनाचा धोका कायम असल्याने सर्व सामने रिकाम्या मैदानावरच खेळवण्यात येत आहेत.
बायर्नचा या स्पर्धेतील यंदाच्या मोसमातील हा सलग 18 वा विजय ठरला. गेल्या डिसेंबरपासून बायर्नला एकदाही पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. उपांत्यपूर्व फेरीत त्यांची लढत बलाढ्य बार्सिलोनाशी होणार आहे. बायर्नच्या रॉबर्ट लेवेनोवस्की याने या स्पर्धेत यंदाच्या मोसमातील 7 सामन्यांतील 13 वा गोल फटकावला.