पुणे – महाराष्ट्राच्या प्रतिष्ठित फायरबॉल बास्केटबॉल स्पर्धेत आयएमइडी संघाने एमआयटीएओइ संघाचा पराभव करत आगेकूच कायम राखली आहे. स्पर्धेचे यंदा २२ वे वर्ष असून या प्रसिद्ध आंतर-महाविद्यालयीन आणि आंतर-कॉर्पोरेट स्पर्धेचे आयोजन लिओ क्लब ऑफ भारती विद्यापीठ पुणे (प्राइम) डी- ३२३४ डी-२ द्वारे केले जाते.
दिवसाचा पहिला सामना भारती विद्यापीठ एरंडवणे कॅम्पस, कोथरूड येथे झाला, ज्यामध्ये आयएमइडी विरुद्ध यमआयटीएओइ होते.
आय. ए म.इ.डी ने एम.आय.टी.ए.ओ.इ वर ५२-४१ च्या अंतिम स्कोअरसह विजय मिळवला आणि ११-गुणांची आघाडी मिळवली. हाफटाइममध्ये, एम.आइ.टी ने ३०-२३ ने आघाडी घेतली आणि शेवटी विजय मिळवला. सुमित थापाने आय .एम. इ .डी चे १९ गुणांसह नेतृत्व केले, त्याला विनायक कुमार (१६ गुण) आणि सिद्धांत सिंग (६ गुण) यांनी पाठिंबा दिला. एम.आय.टि.ए ओ.इ च्या अमृत कडभामे (२४ गुण), ओम पवार (८ गुण), आणि सिद्धांत मिश्रा (५ गुण) यांनी दमदार कामगिरी करूनही ते कमी पडले. अमृत कडभामे ला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात भरती विद्यापीठ इंजिनिअरिंगचा भरती विद्यापीठ फार्मसी विरुद्ध सामना झाला, भरती विद्यापीठ इंजिनियरिंगने ४७-१३ गुणांसह गेमवर वर्चस्व राखून ३४ गुणांची आघाडी मिळवली. हाफ टाईम २४-५ अशी आघाडी घेत, भरती विद्यापीठ इंजिनिअरिंगने विजय मिळवला, ध्रुव पटेलने ८ गुणांसह आघाडी घेतली, त्यानंतर अंश अग्रवाल (७ गुण) आणि नीलेश माने (६ गुण) होते. शौनक धोंगडेने ९ गुणांचे योगदान दिले परंतु प्रयत्न करूनही तो कमी पडला.
तिसरा सामना आय.एल.एस विरुद्ध एम.आय.टी.ए.ओ.इ होता. आ.एल.एस ने एम.आय.टी.ए.ओ.इ वर ४३-२० च्या कमांडिंग स्कोअरसह विजयाचा दावा केला आणि २३-गुणांची आघाडी मिळवली. हाफटाइममध्ये २१-६ ने आघाडीवर असताना, आएलएस विजेते म्हणून उदयास आले, द्रीशे चुग १८ गुणांसह स्कोअरकार्डमध्ये अव्वल, त्यानंतर गौतम गर्ग (१२ गुण), आणि सुमित रोनपट्टे (४ गुण) होते. पराभूत संघातील अमृत कडभामे (१२ गुण), ओम पवार (३ गुण) आणि येशांक चावके (२ गुण) यांनी प्रशंसनीय कामगिरी करूनही ते कमी पडले. सामनावीर म्हणून नचिकेत कुलकर्णीला गौरविण्यात आले.