Basketball – महाराष्ट्राच्या प्रतिष्ठित फायरबॉल बास्केटबॉल या प्रसिद्ध आंतर-महाविद्यालयीन आणि आंतर-कॉर्पोरेट कार्यक्रमाचे आयोजन लिओ क्लब ऑफ भारती विद्यापीठ पुणे (प्राइम) डी- ३२३४ डी-२ द्वारे केले जाते. या स्पर्धेत व्हीआयटी संघाने बीवीपी एनसीएल संघाचा पराभव केला व स्पर्धेत आगेकूच कायम राखली आहे.
दिवसाचा पहिला सामना भारती विद्यापीठ एरंडवणे कॅम्पस, कोथरूड येथे झाला, ज्यामध्ये व्हीआयटी विरुद्ध बीविपी एनसीएल असा सामना झाला. व्हीआयटी ने बीवीपी एनसीएल वर १९-गुणांची आघाडी मिळवत ६६-४७ च्या अंतिम स्कोअरसह विजय मिळवला. निलेश तोष्णीवालला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात, आयएलएस मुलींच्या संघाचा सामना बीव्हीपी एनसीएल मुलींच्या संघाशी झाला, आयएलएसने ३३-१७ गुणांसह खेळावर वर्चस्व राखून १६-गुणांची आघाडी मिळवली. सान्या मोमीनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
IPL : ‘या’ गोलंदाजाने टाकली होती आयपीएलची पहिली Super Over, आज ‘तो’ जगत आहे अज्ञाताचे जीवन….
तिसरा सामना बिव्हीपी फिजिकल विरुद्ध झील असा होता. बीव्हीपी फिजिकलने ५३-३२ च्या कमांडिंग स्कोअरसह झीलवर २१ गुणांची आघाडी मिळवून विजय मिळवला. अफलातून खेळ केलेल्या अमरला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.