नवी दिल्ली – आयपीएल, आयएसएल, बॅडमिंटन लीग या स्पर्धांच्या धर्तीवर बास्केटबॉलचीही लीग सुरू व्हावी, अशी मागणी भारताच्या बास्केटबॉल संघाचा कर्णधार विशेष भृगवंशी याने केली आहे.
देशात हा खेळ गेल्या 4-5 वर्षांपासून जास्त लोकप्रिय होत आहे. हे चांगले लक्षण आहे. मात्र, त्याची व्याप्ती आणखी वाढविण्यासाठी विविध क्रीडा प्रकारांतील लीगप्रमाणे या खेळातही राष्ट्रीय स्तरावरची लीग सुरू करण्यात आली तर देशातही अव्वल खेळाडू तयार होतील. देशात जर व्यावसायिक लीगला सुरुवात झाली तर नवोदित खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळेल व त्यातूनच राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता असलेले खेळाडू गवसतील, असे मतही त्याने व्यक्त केले.