सायंकाळी सहापर्यंत 21 बाधित
जळोची – बारामतीमध्ये रविवारी (दि. 9) सकाळी 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यात आणखी सहा जणांची भर पडल्याने सायंकाळी सहापर्यंत 21 जणांना लागण झाली होती.
सकाळी 101 नमुन्यांपैकी 80 जण निगेटिव्ह आले असून 9 प्रलंबित नमुन्यांचा अहवाल आला आहे.
यामध्ये सहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात बारामती शहरातील 68, 43 वर्षीय महिला, गुणवडीतील 26 वर्षीय युवक, उर्जा भवन येथील 20 वर्षीय युवती, मोरेवाडी येथील 61 वर्षीय पुरुष व बारामती शहरातील 36 वर्षीय पुरुष या रुग्णांचा समावेश आहे. आता बारामती शहरातील रुग्ण संख्या 257 वर पोहोचली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली .