बारामती तालुका पोलिसांची बेधडक व सर्वात मोठी कारवाई

३१२ किलो गांजासह ५६ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Madhuvan

बारामती : बारामती तालुका पोलिसांनी बेधडक व अलिकडील काळातील बारामतीतील सर्वात मोठी कारवाई केली आहे. आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेल्या ३१२ किलो गांजासह ५७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त केला आहे.

पाटस-बारामती रस्त्यावर बारामती तालुका पोलिसांनी सुमारे ४७ लाख रुपयांच्या गांजासह १० लाख रुपयांचा टेम्पो अशा ५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तालुका पोलिसांनी ४७ लाख रुपयांचा पकडलेला गांजा ही अलिकडील काळातील बारामतीतील सर्वात मोठी कारवाई आहे.

या प्रकरणी चौघांविरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्‍यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत कलम NDPS कायदा 1885 कलम 20 ( ब ) / 22 अनव्हे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंडवडी गावच्या हद्दील ड्रायव्हर ढाब्याजवळ एक तपकिरी रंगाचा आयशर टेम्पो येत असल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी हा टेम्पो थांबवून झडती घेतली असता त्यात ११ पोती आढळून आली,या गांजाची किंमत सुमारे ४६ लाख ९३ लाख रुपयांची असून सदर घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगूटे करीत आहेत, अशी माहिती बारामती विभागाचे उपपोलीस अधीक्षक नारायण शीरगांवकर यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.