पूंछ, राजौरीमध्ये पाक सैन्याकडून गोळीबार

जम्मू – जम्मू-काश्‍मीरमधील नियंत्रण रेषेवर पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी सैन्याने आज गोळीबार केला. भारतीय लष्कराने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले, असे संरक्षण प्रवक्‍त्यांनी सांगितले. 

सीमेवरून पूंछ जिल्ह्यातील शाहपूर, किरणी आणि कासबा भागात आणि राजौरीमधील सुंदेरबनी भागात चिथावणीखोरपणे गोळीबार केला आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पाकिस्तानी सैन्याकडून दुपारी 2.30 वाजता पूंछ जिल्ह्यातील तीन ठिकाणी प्रथम गोळीबारास सुरूवात केली गेली आणि त्यापाठोपाठ उखळी तोफांचा मारा आणि लहान शस्त्रांचाही मारा केला गेला. त्यानंतर सुंदरबनी भागातही याच गोळीबाराची पुनरावृत्ती झाली, असे प्रवक्‍त्यांनी सांगितले.

या गोळीबारामध्ये भारतीय बाजूकडून कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. अखेरचे वृत्त येईपर्यंत हा गोळीबार सुरूच होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.