अमेरिकेत आणखी एका वादळाचा धोका

ह्युस्टन – अमेरिकेमध्ये बिटा नावाचे चक्रिवादळ टेक्‍सास आणि ल्युसियानाच्या दिशेने घोंघावते आहे. उद्या हे वादळ थडकण्याची शक्‍यता आहे. या वादळाची तीव्रता पाहता या भागात अतिजोरदार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. 

काही भागांमध्ये 15 इंचांपर्यंत पर्जन्यवृष्टीची शक्‍यता ‘युएस नॅशनल हरिकेन सेंटर’ने दिलेल्या इशाऱ्यामध्ये वर्तवण्यात आली आहे. काल याच इशाऱ्यामध्ये 20 इंच पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली होती. 

बिटा वादळामुळे ताशी 85 मैल वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता आहे. बिटा वादळ संथ गतीने पुढे सरकत असून सागरी किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग अधिक तीव्रपणे जाणवत आहे. सॅन ल्युईस पास पासून टेक्‍सासमधील सॅबाईन पासजवळ वादळाची तीव्रता अधिक जाणवते आहे.

टेक्‍सासच्या मध्य भागात किंवा आखाती किनारपट्टीच्या वरच्या भागात बिटा वादळ किनारपट्टीवर थडकण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर ते ईशान्येच्या दिशेने आणि ल्युसियानाच्या दिशेने या आठवड्याभरात सरकण्याची शक्‍यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग मर्यादित असला, तरी पाऊस मात्र खूप होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.