बारामती -करोनाचा वाढता धोका लक्षात घेता मास्क घालणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासनाने मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांची अंमलबजावणी बारामतीत सोमवारी (दि. 29 जून) पासून सुरू करण्यात आली आहे. तर मंगळवारी (दि. 30 जून) दिवसभरात 98 जणांवर कारवाई करीत तब्बल 21 हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्यामुळे 20 रुपयांचा मास्क 200 रुपयांना पडल्याची भावना बारामतीकरांमध्ये निर्माण झाली आहे.
शहरातील भिगवण रोड, सीटी इन, पेन्सील चौक याठिकाणी बारामती पोलीस ठाणे व नगपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. यावेळी प्रत्येकाडून 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवई अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, मुख्याधिकारी योगेश कडूसकर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
निरीक्षक आप्पासाहेब घोलप, आरोग्य निरीक्षक, राजेंद्र सोनवणे पोलीस हेडकॉस्टेबल भाऊसाहेब पलंगे, दत्ता सोननीस, दादा ओमासे, भुलेश्वर मरळे, प्रशांत राऊत, अमोल नरुटे, रणजीत मुळीक, नगर परिषद कर्मचारी संजय गडीयल, विनोद सिसवाल, निखील शिलवंत, सतीश धाईंजे आदींनी ही कारवाई केली.