बारामती (प्रतिनिधी) : पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बारामती शहरात घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही.
तुषार सानप असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शहरातील पोलीस लाईन मध्ये राहत असलेल्या घरात तुषार सानप यांनी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेली तीन वर्षापासून सानप बारामती शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.