बारामती (प्रतिनिधी) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारामती एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार अडकले आहेत. लॉक डाऊनमुळे सर्वत्र बंद असल्यामुळे या कामगारांच्या जेवणाचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन बारामती इंडस्ट्रीज प्रा. लि. चे संचालक सचिन उर्फ निलेश कुलकर्णी यांनी येथे अडकलेल्या परप्रांतीय कामगारांच्या एक वेळच्या जेवणाची सोय केली आहे.
बारामती एमआयडीसीमध्ये कामाच्या निमित्ताने अनेक परप्रांतीय कामगार आलेले आहेत. केंद्र सरकारने लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर बारामतीतही त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे कंपन्यांसह जेवणाच्या सोईदेखील सध्या बंद आहेत. या पार्श्वभूमीवर येथील कामगारांचे जेवणाचे हाल होऊ लागले आहेत.
ही बाब लक्षात घेऊन बारामती इंडस्ट्रीज प्रा. लि. चे संचालक सचिन उर्फ निलेश कुलकर्णी यांनी येथे अडकलेल्या परप्रांतीय कामगारांच्या एक वेळच्या जेवणाची सोय केली आहे. त्यांचे चालक धनंजय ठोंबरे हे या कामगारांना थेट एमआयडीसीत जाऊन जेवण पोहोचवत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या संकट काळात या परप्रांतीय कामगारांना आधार मिळाला आहे.