बारामती फेस्टिव्हल अडचणीत

बारामती – बारामती गणेश फेस्टिव्हलसाठी नटराज नाट्य कला मंडळासमोर उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड काढून टाकण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. याबाबतची नोटीस प्रियदर्शनी कर्णबधिर मतिमंद विद्यालय म्हणजेच नटराज नाट्य कला मंडळाला देण्यात आली आहे.

नटराज नाट्य कला मंडळच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही बारामती गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळासमोर पत्र्याचे शेड उभारून फेस्टिव्हलचे आयोजन करणे बेकायदेशीर आहे. याबाबतची तक्रार भाजपचे सुरेंद्र जेवले यांनी पाटबंधारे विभाग तसेच नगर परिषद प्रशासनाकडे केले आहे. सदर जागा प्रियदर्शनी कर्णबधिर मतिमंद विद्यालयाची आहे. मात्र, त्या जागेचा विद्यालया व्यतिरिक्त इतर कारणासाठी बेकायदेशीर वापर होत असल्याचे जेवरे यांनी तक्रारीत म्हटले आहे; त्यानुसार पाटबंधारे विभागाच्या वतीने आदेश देण्यात आले आहेत. विद्यालयाच्या व्यतिरिक्त इतर कारणास्तव जागेचा वापर झाल्यास सदर संस्थेसोबत झालेला करारनामा रद्द करण्यासंदर्भात प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल, असा आदेश पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता रणपिसे यांनी दिले आहेत.

बारामती गणेश फेस्टिव्हलसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे पत्र्याचे शेड उभारण्यात येत आहे. तक्रारींच्या माध्यमातून विरोधक गणेश फेस्टिव्हल सारख्या उत्सवात राजकारण करीत आहे. सदर जागेचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
– किरण गुजर, अध्यक्ष, नटराज नाट्य कला मंडळ

Leave A Reply

Your email address will not be published.