बारामती ( प्रतिनिधी) – सासू-सुनेच्या गळ्याला चाकु लावुन आठ लाखांचा मुद्देमाल अज्ञात इसमांनी पळविल्याची घटना शहरातील फलटण रोडवर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत प्रमिला भाऊसाहेब भालेराव (वय 42 वर्षे व्यवसाय घर काम राहणार फलटण रोड भालेराव गॅरेज पाठीमागे कसबा बारामती) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात इसमानं वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास यातील 2 अज्ञात इसमांनी फिर्यादीचे फलटण रोड येथील घरामध्ये दरवाजातून आत प्रवेश केला. प्रमिला भालेराव झोपी गेलेल्या टीव्ही रूम मध्ये जाऊन त्यातील एकाने फिर्यादीचे उजवे दंडाला हाताने हलवून जागे केले. पैसे कुठे ठेवले आहेत दे त्यावर प्रमिला यांनी कसले पैसे असे म्हणून मोठा आवाज केला.
त्यानंतर आवाज ऐकून बेडरूम मध्ये झोपलेली त्यांची सून काजल ही बेडरूम मधून बाहेर आल्या असता त्यातील एका इसमाने त्याचे बुटांमध्ये ठेवलेला सुरा काढून काजल यांच्या गळ्याला लावून पैसे आणि घरातील दागिने दे नाहीतर तुझे सुनेला खलास करील असा दम दिला .
त्यानंतर प्रमिला यांनी कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम काढून त्यातील एका इसमाच्या हातात दिले .त्याने तो माल एका शाख मध्ये टाकून शाख पाठीला अडकून रोख रक्कम 6 लाख50,हजार रुपये, 1 लाख50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे पट्टीचा तीन तोळ्याचा गंठण घेऊन फलटण बाजूकडे पोबारा केला.