बारामती – करोनामुळे होत असलेल्या रक्त तुटवड्यावर मात करण्यासाठी 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून साई लॅब व कडक स्पेशल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिरात तब्बल 73 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 73 व्या प्रजासत्ताकदिनी 73 रक्त बॅगचे संकलन करून एका चांगल्या प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा केला.
तर या 73 रक्तदात्यांमध्ये जवळपास 40-45 रक्तदात्यांनी पहिल्यांदाच रक्तदान केल्याचे दिसून आल्याने आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले व हेच या शिबिराचे हे खास वैशिष्ट्य ठरले. या रक्तदान शिबीरासाठी मुक्ताई ब्लड सेंटर यांनी संकलन केले व विशेष सहकार्य केले.
शिबिराच्या शेवटी सर्वच रक्तदात्यांचे गणेश सवाणे,समाधान मोरे, रोहन कांबळे,रोहित सवाणे,लक्ष्मण घाडगे आदिंनी आभार मानले व असेच समाजउपयोगी कार्यक्रम करण्याचे सर्वांना आवाहन केले.