खडकवासला – गेल्या काही दिवसापासून सिंहगड परिसरात तापाची साथ जोरदार वाढलेली आहे. त्यामुळे याचा गैरफायदा घेत अनेक खासगी डॉक्टरांकडून 50 रुपयांचे सलाईन पाचशे रुपयांना देऊन रुग्णांची लूट करत असल्याचा प्रकार दिसून येत आहे.
वातावरणातील बदलामुळे सध्या ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशा प्रकारचा रुग्ण संकेत वाढ झाली आहे. घरातील एका व्यक्तीला व्हायरल झाल्यास त्यापासून दुसऱ्याला होतो. त्खासगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयातही गर्दी दिसत आहे. काही खासगी डॉक्टर व रुग्णालयांकडून रुग्णांना अव्वाचा सव्वा पैसे उकळून त्यांची लूट केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक खासगी रुग्णालयात 50 रुपयांच्या सलाईनचे भाव तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत आकारले जात आहेत. रुग्णांची आर्थिक पिळवणूक सुरू असताना अन्न व औषध प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील रोजची ओपीडी ची संख्या
- खानापूर -150
- खेडशिवापूर -150
- सांगरुण- 50
पिळवणूक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
सध्या व्हायरलची साथ सगळीकडे जोरात सुरू असल्याने रुग्णांची वाढती संख्या पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयात सलाईन पाचशे रुपयांना कशी? व्हायरल फिवरचे रुग्ण वाढल्याने खासगी रुग्णालयात सलाईनचे भाव 500 रुपये इतके झाले आहेत. गाव खेड्यातही रुग्णांची लूट होत असताना अन्न औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.