नगर -सध्या कोविड विषाणूने थैमान घातल्यामुळे संपूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत स्थानिक नगर अर्बन बॅंक, मर्चंट बॅंक व शहर सहकारी बॅंक यांनी त्यांच्या सभासदाना कोविड कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी, अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.
लॉकडाऊन काळात छोट्या व्यापाऱ्यांचे उत्पन्न बंद झाल्यामुळे भांडवल संपले आहे. अशा परिस्थिती मध्ये यांना आर्थिक सहाय्य केल्यास हे छोटे व्यापारी पुन्हा उभारी घेतील. केंद्र सरकार ने कोविड कर्ज उपलब्ध करून दिले आहे, परंतु त्याचा फायदा मोठे व्यावसायिक व नोकरदारांना होत आहे. त्याचा कोणताही फायदा लहान व्यावसायिकाना होत नाही.
शासनाने ही लहान व्यावसायिकांसाठी कोणतीही आर्थिक योजना जाहीर केली नाही. पंडित दिन दयाल पतसंस्थेने व्याज दर कमी केले ही अभिनंदनीय गोष्ट आहे, गरजवतुना छोटे कर्ज उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे. त्यामुळे स्थानिक सहकारी बॅंकानी सध्याचे गंभीर परिस्थिती चा विचार करून, सभासदाना कमी व्याजदराने व विना जमीनदार कोविड कर्ज योजना सुरु करून कमीत कमी कागदपत्रे स्वीकारून उपलब्ध करून कर्ज द्यावे अशी श्रीनिवास बोज्जा यांनी केली.