BANK JOB : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कामगारसह सब स्टाफच्या पदांसाठी भरती होणार आहे. आजपासून म्हणजेच २० डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी (सेंट्रल बँक ऑफ इंडिया सब स्टाफ रिक्रूटमेंट 2023) अधिकृत वेबसाइट – Centralbankofindia.co.in आणि ibpsonline.ibps.in/cbiskssnov23 वर जाऊन अर्ज करू शकतात.
राज्यानुसार रिक्त जागा
या भरती मोहिमेअंतर्गत गुजरातमध्ये 76, मध्य प्रदेशात 24, छत्तीसगडमध्ये 14, दिल्लीत 21, राजस्थानमध्ये 55, ओडिशामध्ये 2, उत्तर प्रदेशमध्ये 78, महाराष्ट्रात 118, बिहारमध्ये 76, झारखंड 20 जागांसाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. अर्ज आणि फी भरण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2024 आहे( Central Bank of India Recruitment )
परीक्षा फेब्रुवारीमध्ये होईल
फेब्रुवारी 2024 मध्ये परीक्षा होणार असून त्याच महिन्यात निकालही जाहीर होणार आहेत. मार्च 2024 मध्ये स्थानिक भाषेची परीक्षा होईल आणि त्याच महिन्यात निकाल जाहीर होईल. निवड यादी एप्रिलमध्ये येईल. ( Bank Job )
पात्रता आणि वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे. ३१ मार्च २०२३ रोजी अर्जदारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २६ वर्षे असावे. ( Job in bank )
परीक्षेचा प्रकार
ऑनलाइन लेखी परीक्षा आयबीपीएसद्वारे घेतली जाईल. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. इंग्रजीतून 10 प्रश्न, सामान्य जागरूकता 20, प्राथमिक अंक गणित 20, सायकोमेट्रिक चाचणी (रिझनिंग) 20 म्हणजेच एकूण 70 गुण असतील. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची स्थानिक भाषेची (ज्या राज्यासाठी ते अर्ज करतील त्या राज्याची) चाचणी ३० गुणांची असेल. ( bank vacancy )
अर्ज फी
अर्जदारांना अर्ज फी म्हणून 850 रुपये भरावे लागतील. SC, ST, अपंग प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 175 रुपये जमा करावे लागतील. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर शुल्क भरावे लागेल. शेवटी फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.