SBI SCO Bharti : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही उत्तम सुवर्णसंधी आहे. SBI SCO भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया आज म्हणजेच 13 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
SBI SCO Bharti : अर्ज करण्याची शेवटची तारीख
SBI SCO भरतीसाठी उमेदवार 04 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे, बँकेतील स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या 131 पदे भरण्यात येणार आहेत.
SBI SCO Bharti : किती जागा ?
मॅनेजर (क्रेडिट विश्लेषक): 50
सहाय्यक मॅनेजर (सुरक्षा विश्लेषक): 23
उपव्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक): 51
व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक): 3
सहाय्यक महाव्यवस्थापक (ॲप्लिकेशन सुरक्षा): 3
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार (CDBA): १
SBI SCO भर्ती 2024 अर्ज फी
SBI SCO भरतीसाठी, सामान्य/EWS/OBC श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. 750 भरावे लागतील. SC/ST/PWBD उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
असा करा अर्ज
अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या.
होमपेजवर असलेल्या करंट ओपनिंग वर क्लिक करा.
अर्ज भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज फी भरा.
फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घ्या.
Rajyasabha Election : भाजपचे राजस्थानातील 2 उमेदवार जाहीर.. ‘या’ तारखेला होणार मतदान
Stock Market Closing | शेअर बाजाराने पुन्हा वेग पकडला, सेन्सेक्समध्ये 483 अंकांची वाढ