Indian Bank Recruitment 2024 : बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेच्या स्पेशलिस्ट ऑफिसरच्या अनेक पदांसाठी जागा निघाल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १२ मार्चपासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ एप्रिल आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट www.Indianbank.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या SC/ST/PWBD उमेदवारांसाठी अर्जाची फी 175 आहे. तर इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी 1000 आहे. | Indian Bank Recruitment 2024
रिक्त जागांचा तपशील
146 विशेषज्ञ अधिकारी पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.
कसा करायचा अर्ज
सर्व प्रथम, अधिकृत वेबसाइटला भेट द्या www.indianbank.in वर जा.
त्यानंतर होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा
यानंतर, RECRUITMENT OF SPECIALIST OFFICERS – 2024 वर क्लिक करा.
आता स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
पुढे, “Click here for New Registration” असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
मग स्वतःची नोंदणी करा आणि अर्जासह पुढे जा.
यानंतर अर्जाची फी जमा करा.
आता तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
शेवटी, भविष्यातील गरजेसाठी त्याची प्रिंट घ्या. | Indian Bank Recruitment 2024