मुंबई – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री नेहा मर्दाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेहा ही गरोदर असून त्यासंबंधित काही अडचण आल्याने तिला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून पुढील दोन दिवस तिला डॉक्टरांच्या नजरेखाली राहावे लागणार आहे.
नेहाच्या प्रकृतीविषयी अद्याप तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सध्या नेहा प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यात असल्याने तिच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नेहाने ‘देवों के देव महादेव’, ‘पिया अलबेला’, ‘लाल इश्क’ अशा छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण ‘बालिका वधू’ या मालिकेमुळे नेहाला जास्त लोकप्रियता मिळाली.
नेहाने 2012 साली आयुष्मान अग्रवालसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या 10 वर्षानंतर नेहाने चाहत्यांना आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. यावर अनेकांनी तिचे अभिनंदन केले होते. आई होणार असल्याची पोस्ट शेअर करत नेहा म्हणाली होती की, “मी आई होणार असल्याचं मला कळल्यानंतर खूप आनंद झाला होता. आई होण्याची माझी खूप इच्छा होती. आता लग्नाच्या 10 वर्षांनंतर आम्ही आई-बाबा होणार असल्याने आम्ही खूप आनंदी आहोत. गेल्या 10 वर्षांपासून आम्ही बाळासाठी प्रयत्न करत होतो. अनेकांनी मला बाळ होत नसल्याने टोमने मारले . पण आता मी गरोदर असल्याचा जास्त आनंद आहे.”