नवी दिल्ली – मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे माजी अर्थ व महसूलमंत्री मनीष सिसोदिया सध्या जेलमध्ये आहेत. अशात सिसोदिया यांनी थेट जेलमधून पत्र लिहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सिसोदिया यांनी या पत्रातून पंतप्रधान कमी शिकलेले असतील तर ते देशासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे म्हंटले आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीबाबत वाद निर्माण झाला होता. पंतप्रधानांच्या डिग्रीचा हा वाद थांबतो न थांबतो तोच जेलमध्ये असलेल्या मनीष सिसोदिया यांनी एक पत्र लिहीत थेटपणे नाव न घेता देशाचा पंतप्रधान आणि त्याचे शिक्षण याबाबत भाष्य केले आहे. सिसोदिया हे सध्या तिहार जेलमध्ये आहेत.
आपल्या पत्रात सिसोदिया म्हणतात, “पंतप्रधानांना विज्ञान समजत नाही. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही. गेल्या काही वर्षांत त्यांनी 60,000 शाळा बंद केल्या. भारताच्या प्रगतीसाठी सुशिक्षित पंतप्रधान असणे अत्यंत आवश्यक आहे” कमी शिकलेला पंतप्रधान आजच्या तरुणाईचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ठेवतो का ? असा सवाल देखील मनीष सिसोदिया यांनी यावेळी उपस्थित केला.
Jailed former Delhi deputy CM Manish Sisodia writes to PM Modi, raises questions on his education.
“For the progress of India, it is necessary to have an educated PM,” Sisodia writes in his letter to the PM. pic.twitter.com/yV7peRjns3
— ANI (@ANI) April 7, 2023