नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून ट्विटर अनेक नवनवीन बदल करताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या दुनियेत ट्विटर हे माध्यम इतर माध्यमांच्या तुलनेत अधिक विश्वासार्ह्य होते. मात्र उद्योगपती एलन मस्क यांच्याकडे मालकी गेल्यानंतर ट्विटरने अनेक बदल करायला सुरुवात केली आहे. या बदलांमुळे ट्विटरची विश्वासार्हता कुठंतरी कमी होताना दिसतेय. अनेक वर्षांपासून ट्विटरची ओळख असलेला ब्ल्यू बर्ड लोगो नुकताच बदलण्यात आला. यानंतर आता ट्विटरने आणखी एक मोठा बदल केला आहे.
‘ट्विटर’ व्हिरिफाइडकडून आता सर्व व्हेरीफाईड अकाउंट अनफॉलो करण्यात आले आहेत. काही तासांमध्येच ट्विटर व्हिरिफाइडकडून ही कृती करण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडालेली पहायला मिळाली. ट्विटरने फॉलो केलेल्या व्हेरीफाईड अकाऊंटची संख्या सुमारे 420,000 इतकी होती.
ट्विटरची मालकी घेतल्यापासून एलन मस्क यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करणे, ब्लू टिक बाबतचे निर्णय यामुळे ते चांगलेच चर्चेत राहिले. मात्र ट्विटरकडून सुरु असलेले हे धक्कादायक बदल युजर्सचं मात्र अनेकदा गोंधळ उडवून देताना दिसत आहेत.
‘Twitter Verified’ has mass unfollowed legacy all verified accounts within a few hours.
The account has unfollowed nearly 225,000 accounts since yesterday pic.twitter.com/tOTQp2wJV3
— ANI (@ANI) April 7, 2023
ब्लु टिकच्या बदलनानंतर संभ्रमावस्था
ट्विटर व्हेरीफाईड असणं ही सर्वसामान्यांसाठी अभिमानाची बाब होती. मात्र ट्विटरने आपल्या ब्लु टिक वाल्या पॉलिसीमध्ये बदल केला आणि दरमहा पैसे भरून कोणालाही व्हेरीफाईड टिक देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. याशिवाय ब्लु टिक युजर्सना आणखी काही सुविधा देखील दिल्या जातात. ज्यामध्ये शब्दांची मर्यादा तसेच अनडू सारखे पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात येतात. ट्विटमध्ये वारंवार होणारे बदल पाहता याचा परिणाम त्यांच्या युजर्सवर देखील होताना दिसून आला.