राहू, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरातील जिल्हा बँकेच्या राहू शाखेमध्ये मार्च अखेरमुळे गर्दी दिसून आली होती. सोसायटीतील पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे.
राहू बेट परिसर हा शेती बरोबर व्यापारतही अग्रेसर आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी खातेदार बँकेत मोठी गर्दी करीत आहेत. शाखेला सात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संलग्न असल्यामुळे सभासद वर्षाअखेरीस आपले कर्ज भरण्यासाठी गर्दी करीत आहेत.
त्यातच शासनाने एक परिपत्रक कडून चालू बाकी असलेल्या सभासदांना कर्ज भरताना फक्त मुद्दल भरून घेण्यास सांगितल्यामुळे चालू कर्ज असलेल्या सभासदांची देखील गर्दी वाढत आहे. शाखेत शैक्षणिक कर्ज, कॅश क्रेडिट, ठेव कर्ज, सोने तारण कर्ज यासारखी अनेक प्रकारची कर्जे ही शाखा देत असते, त्यामुळे व्यवहार पूर्ण करण्यासाठीही वैयक्तिक सभासद देखील गर्दी करीत आहेत.