मुंबई – काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. यानंतर काँग्रेस पक्षात असलेली गटबाजी सर्वांसमोर आली. बाळासाहेब थोरात यांनी पक्ष स्रेष्ठींना याबाबत एक पत्र देखील लिहिल्याचे समजते. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण तापलेले असताना इंदुरीकर महाराजांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय ज्याची संपूर्ण संगमनेरमध्ये चर्चा आहे.
बाळासाहेब थोरात यांचा ७ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता त्यानिमित्त इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. यानिमित्त इंदुरीकर महाराजांनी बाळासाहेब थोरात यांच्याबाबत जे वक्तव्य केले आहे त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
“कोणत्याही दगडाची मूर्ती होत नाही. घाव सहन करणारे दगडचं मूर्तीसाठी वापरली जातात. ज्यांच्यात घाव सहन करण्याची ताकद आहे त्यांना यश निश्चित आहे.जे दगडं घाव सहन करतात तीच दगडं मूर्तीसाठी उपयोगी पडतात. हे वाक्य बाळासाहेब थोरात यांना लागू होतं. क्षेत्र कोणतंही असो, आपला माणूस हा आपला स्वाभिमान असतो असं इंदूरीकर महाराज यावेळी कीर्तनात म्हणतात”. कीर्तनातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस, इंदुरीकर महाराजांचा हा व्हिडीओ जोरदार चर्चेत #Balsahebthorat #indurikar #sangamner #birthday pic.twitter.com/Q3xXETSBUa
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) February 8, 2023