कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी अयोध्येतील राम मंदिर अभिषेक सोहळ्याच्या अनुषंगाने कोलकाता शहरात सर्वधर्म समरसता रॅली आयोजित केली होती. विविध धर्माचे धार्मिक नेते आणि पक्षाच्या नेत्यांसमवेत ममतांनी हाजरा मोरे येथून ही रॅली सुरू केली.
या रॅलीत ममता चालत सहभागी झाल्या होत्या. व त्या रस्त्याच्या कडेला उपस्थित असलेल्या सर्वांना अभिवादन करीत होत्या. शहरातील प्रतिष्ठित कालीघाट मंदिरात पूजा आणि प्रार्थना केल्यानंतर बॅनर्जी यांनी रॅलीला सुरुवात केली.या रॅली दरम्यान त्यांनी पदयात्रा मार्गावरील मशिदी आणि चर्चलाही भेट दिली.
VIDEO | West Bengal CM @MamataOfficial hold an all-faith rally in Kolkata. The ‘rally for harmony’ comes a day when Ram Mandir Pran Pratishtha ceremony was held in Ayodhya. pic.twitter.com/opyRLTZJHq
— Press Trust of India (@PTI_News) January 22, 2024
ममता बॅनर्जी, यांनी यापूर्वी राम मंदिर कार्यक्रमावर “लोकसभा निवडणुकीपूर्वीचा नौटंकी शो” म्हणून भाजपवर टीका केली होती. या रॅलीचा समारोप पार्क सर्कस मैदानावर मोठ्या मेळाव्याने झाला.