मुंबई – बॉलीवूडचा दबंग सलमान खानचा शो ‘बिग बॉस 16’ सुरुवातीपासूनच चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. चाहत्यांच्या हृदयाचा प्राण असलेल्या ‘अब्दू रोजिक’ला काही दिवसांपूर्वी शोमधून बाहेर काढण्यात आले होते. अब्दूला बिग बॉसच्या घराला निरोप देताना पाहून त्याच्या सर्व चाहत्यांच्या डोळ्यात ओलावा आला होता.
अब्दू बेघर झाल्याच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा सर्वांचा लाडका छोटा भाईजान म्हणजेच अब्दू रोजिकने घरात प्रवेश केला. अब्दु रोजिक हा बिग बॉस 16 चा सर्वात आवडता आणि लोकप्रिय स्पर्धक आहे. अब्दु रोजिक हा चाहत्यांच्या हृदयात वसलेला आहे.
दरम्यान, आता अब्दू रोजिकच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सगळ्यांचा लाडका अब्दु रोजिक या शोला कायमचा अलविदा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ही बातमी ऐकून अब्दूच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला असेल. मात्र, या बातमीत किती तथ्य आहे याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, अब्दू रोजिक 12 जानेवारीला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडेल. कामाच्या बांधिलकीमुळे तो बिग बॉसच घर कायमच सोडत आहे. आता लवकरच फेब्रुवारीमध्ये ‘बिग बॉस 16’चा महाअंतिम सोहळा होणार आहे. अशा परिस्थितीत अब्दूने आधीच काही कामाच्या कमिटमेंट्स केल्या होत्या. जे त्याच्यासाठी पूर्ण करणे आवश्यक आहे. बिग बॉसमधील अब्दू रोजिकचा हा शेवटचा निरोप असेल. बिग बॉसमधून अब्दुला घ्यायला कुणीतरी खास येणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.