मुंबई – बॉलिवूडचे स्टार कपल म्हणून ओळखले जाणारे करीना कपूर आणि सैफ अली खान हे अनेकदा चर्चेत असतात. म्हणुनच ही जोडी चाहत्यांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. परंतु नुकतेच सैफ आणि करीना दोघेही ट्रोल होताना दिसत आहेत. कारण आहे सोबत प्रवास करतानाचा समोर आलेला त्यांचा एक व्हिडीओ. ज्यामुळे अनेकजण त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत.
नुकतेच सैफ आणि करीना त्यांच्या कारमध्ये स्पॉट झाले होते. यावेळी सैफ अली खान कार चालवत होता आणि करीना त्याच्या शेजारी बसली होती. दोघांना पाहण्यासाठी माध्यम कर्मीनी गर्दी केली होती. यावेळेसचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये दोघेही गाडीच्या पुढच्या सीटवर बसले होते, पण कोणीही सीट बेल्ट लावलेला नव्हता. यामुळेच दोघे सोशल मीडियावर ट्रोल होताहेत.
View this post on Instagram
सैफ करीना स्टार असूनही नियम पळत नाहीत यावरून अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर सुनावले आहे. नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का ? असा सवाल अनेक युजरने यावेळी विचारला आहे. कामाबाबत बोलायचे झाले तर सैफ अली खान त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात प्रभास आणि क्रिती सेनॉन दिसणार आहेत. दुसरीकडे, करीना कपूर हंसल मेहताच्या एका अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे.