पुणे: पीडीएफए साखळी स्पर्धेच्या व्दितीय व तृतीय श्रेणी गटाच्या सामन्यात एफसी बॅकडिनो आणि सिटी क्लब संघांनी आगेकूच केली. या स्पर्धेच्या तृतीय श्रेणी गटाच्या सामन्यात सिटी क्लब संघाने खडकीयन्स एफसी संघाचा 2-0 असा सहज पराभव केला. इन्व्हेडर्स आणि व्हिजन युनायटेड यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
दोन्ही संघाला एकेक गुण वाटून देण्यात आला. चुरशीचा झालेला आर्यन्स् पिंपरी एफसी आणि भोर एफसी यांच्यातील सामना 1-1 अशा बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटल्याने दोन्ही संघाला समान एक गुण मिळाला. एफसी बॅकडिनो संघाने अशोका इलेव्हन संघाचा 2-0 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल – तृतीय श्रेणी गट – 1) इन्व्हेडर्स – 0 बरोबरी वि. व्हिजन युनायटेड – 0; 2) आर्यन्स पिंपरी एफसी – 1 (प्रतिक यादव 22 मि.) बरोबरी वि. भोर एफसी – 1 (दिनेश पवार 38 मि.); 3) सिटी क्लब – 2 (सार्थक नाईक 18, 29 मि.) वि. वि. खडकीयन्स एफसी – 0; व्दितीय श्रेणी गट – 1) एफसी बॅकडिनो – 2 (लव सूर्यवंशी 2 मि., जेम्स डिसुझा 5 मि.) वि. वि. अशोका इलेव्हन – 0.