मुंबई – राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारमधीलच एक भाग असणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातींवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून केली होती. आज कडू यांच्यासह त्यांच्या कार्यकर्ते सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते. ऑनलाइन जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीत त्याच्या घरासमोर आंदोलन करु, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. त्यामुळे सचिन तेंडूलकरच्या विराधोत आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती. त्यानुसार आजचे आंदोलन झाले.
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची ती जाहिरात असून यावर बंदी तात्काळ बंदी घालण्यात यावी असं ते यावेळी म्हणाले होते. दरम्यान, आज सकाळी सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांसह बच्चू कडू स्वत: आंदोलनात सहभागी झाले. तसेच, आता सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं आहे.
माध्यमांशी बोलताना कडू म्हणाले,“या जाहिराती करणारे इतर सेलिब्रिटी हे भारतरत्न नाहीयेत. भारतरत्न भगतसिंगांना मिळाला नाही, आण्णाभाऊ साठेंना मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. फक्त सचिन तेंडुलकर हा आमचा विषय नाही. भारतरत्न हा आमचा विषय आहे. भारतरत्न उद्या जुगाररत्न होऊ नये. आम्ही वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे”, असंही ते म्हणाले.
आज आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरला घेरल्याचं पाहायला मिळालं आहे. सचिन तेंडुलकरने भारतरत्न परत करावा, अशी मागणी त्यांनी केलीय. सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जी काही जाहिरात केली. ती अतिशय वाईट आहे. सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीमुळे घरंच्या घरं बरबाद होत असतील, तर हे योग्य नाही.