शिरूर – शिरूरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे (वय ७२)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे शिरूर तालुका, शिरूर शहर, पंचक्रोशी, शिरूर हवेली तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांची तब्येत ठीक नव्हती पुणे येथील रुबी हॉस्पीटल, व सध्या शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपाचार सुरू होते. आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. नुकतीच राज्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांची शिरूर येथे भेट घेतली होती. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहूल पाचर्णे यांचे वडील होते, शिरूर नगरसेवक नितिन पाचर्णे यांचे चुलते होत.