नवी दिल्ली- दिल्लीतील मालवीय नगर येथील बाबा का ढाबा यांचा व्हिडीयो तुफान व्हायरल झाला होता. त्यांनतर या ढाब्यावर अनेकांनी रांगा लावल्या.
या सगळ्या रांगापाहून आता जाहिरातीसुद्धा वाढल्या आहेत, अशा संदर्भातील ट्विट आयएएस अधिकारी अवनीष शरण यांनी केलं आहेॆ.
बदला हुआ ‘बाबा का ढाबा’
सब दिख रहे बस ‘बाबा’ नहीं दिख रहे!! pic.twitter.com/U0XOfJhdFW— Awanish Sharan (@AwanishSharan) October 11, 2020
सुरुवातीला ढाबा कसा होता आणि आता कसा आहे, असे दोन्ही फोटो त्यांनी शेअर केला आहे.सुरुवातीला बाबा का ढाब्याचा व्यवसाय ठप्प पडला होता मात्र सोशल मीडियावर व्हीडियो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या ढाब्यावर रांगा लागल्या. त्या भागात लोकांची गर्दी आणि सतत ये-जा पाहता अनेक जाहिरातदारांनी आपल्या जाहिराती येथे लावल्या. त्यात पे-टीएस किंवा अन्य काही कंपन्यांचा समावेश आहे.
ढाबा दिसतो आहे मात्र बाबा दिसत नाही आहे, असंही अवनीष शरण यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. त्यासोबतच फुड कंपनी झोमॅटो कंपनीनेसुद्धा ट्विट केलं आहे. बाबा का ढाबा आता झोमॅटोवर सुद्धा उपलब्ध आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
UPDATE: baba ka dhaba is now listed on zomato and our team is working with the elderly couple there to enable food deliveries
thank you to the good people of the internet for bringing our attention to this ❤️
— zomato india (@ZomatoIN) October 8, 2020