मुंबई – संजय लीला भन्साळी हे अशा दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांच्या चित्रपटांची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतात. ते एक चित्रपट निर्माता आहे जे प्रत्येक चित्रपट अत्यंत उत्कटतेने आणि परिपूर्णतेने पूर्ण करतात. प्रेक्षकांनापूर्वी कधीही न आल्यासारखा अनुभव त्यांच्या चित्रपट बघितल्यानंतर होतो.
रुपेरी पडद्यावर येण्यापूर्वी संजय लीला भन्साळी त्यांच्या कोणत्याही चित्रपटात वर्षानुवर्षे काम करण्यावर विश्वास ठेवतात. विशेष म्हणजे त्याचा पुढचा ‘बैजू बावरा’ हा प्रोजेक्ट गेल्या दोन दशकांपासून त्याच्या मनात आहे. अशात अनेकदा या चित्रपटातील स्टार कास्टवरून अनेक नावांची चर्चा समोर आली दोन गायकांभोवती फिरणारी ही कथा पूर्णपणे संगीतमय चित्रपट असेल.
याशिवाय, “बैजू बावरा” च्या कास्टिंगबाबत अशा अफवा येत आहेत की या चित्रपटात लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसणार आहेत. मात्र, याबाबत सध्या कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र यावेळी या हा चित्रपट होल्डवर असल्याची चर्चा रंगली आहे,
रिपोर्ट्सनुसार, संजय लीला भन्साळी यांनी हा चित्रपट होल्डवर ठेवला आहे. या चित्रपटाचा बजेट ३५० कोटी आहे.अशात पैशांच्या कमतरतेमुळे हा चित्रपट आता होल्डवर ठेवण्यात आला आहे. मात्र याचबोरबर अशीही माहिती समोर येत आहे की या चित्रपटाच्या बजेटवर अनेक स्टुडिओंची चर्चा केली जात आहे. येत्या काळात या चित्रपटाच्या बजेटवर चर्चा केल्यानंतर या चित्रपटाच्या पुढच्या कामावर तयारी करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या लीड रोलसाठी अभिनेता कार्तिक आर्यन, रणवीर सिंह तर अभिनेत्री दीपिका पदुकोण आलिया भट, नयनतारा यांची नावे केल्या अनेक दिवसापासून चर्चेत आहे.