अयोध्या – अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन आज होणार आहे. यानिमित्त भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती अयोध्येत दाखल झाल्या असून अयोध्येनं सर्वांना एकत्र आणलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
उमा भरती म्हणाल्या कि, अयोध्येनं सर्वांना एकत्र आणलं. आता देश संपूर्ण जगात मान उंचावून सांगू शकेल की आमच्या देशात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, अशी भावाना मत त्यांनी व्यक्त केले आहे.
अयोध्या ने सभी को एक कर दिया है। अब ये देश पूरी दुनिया में अपना माथा ऊंचा उठाकर कहेगा कि हमारे यहां कोई भेद-भाव नहीं है: राम जन्मभूमि स्थल पर बीजेपी नेता उमा भारती pic.twitter.com/Z2yIScCcf6
— ANI_HindiNews (@AHindinews) August 5, 2020
दरम्यान, रामजन्मभूमी आंदोलनाला जनाधार मिळवून देण्यात आणि त्या चळवळीला आक्रमक रुप देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या नेत्या अशी उमा भारती यांची ओळख आहे. त्यांच्यावर बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराचे भूमीपूजन होणार आहे.