जिथे वयाची पन्नाशी ओलांडल्यावर लोक वेगवेगळ्या दुखण्यांनी त्रस्त झालेले दिसतात, तिथे बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत जे वयाची अर्धशतक ओलांडल्यानंतरही आपला फिटनेस ज्या पद्धतीने राखताना दिसतात की, त्यांना पाहून ‘क्या बात है!’ असेच उद्गार बाहेर पडतील. पन्नाशी पार केलेल्या लाखो लोकांसाठी हे कलाकार प्रेरणास्त्रोत बनले आहेत. बॉलिवूडच्या या कलाकारांनी आपल्याला रुपेरी पडद्यावर नेहमीच प्रभावित आश्चर्यचकित केले आहे. ते खूप समर्पित आणि मेहनती आहेतच, पण वयाच्या पन्नाशीनंतरही तंदुरुस्त दिसतात. आजच्या काळात, केवळ अभिनय कौशल्य मनोरंजन उद्योगावर राज्य करण्यासाठी पुरेसे नाही. शीर्षस्थानी राहण्यासाठी अभिनेत्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. चला तर, आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत पन्नाशी पार केली आहे आणि तरीही ते फिटनेसच्या बाबतीत तरुण कलाकारांना कडवी स्पर्धा देऊ शकतात.
- अनिल कपूर
अनिल कपूरकडे बघून कोणीही असे म्हणू शकत नाही की त्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. या वयातही हा अभिनेता खूप तरुण दिसतो. बॉलीवूडमधील इतर कोणत्याही तरुण अभिनेत्यापेक्षा खूप सुंदर आणि फिट दिसणारा हा अभिनेता, वयाच्या 60 व्या वर्षीही तो दिवसेंदिवस तरुण होत आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये! अनिल कपूरने स्वतःला अशा प्रकारे सांभाळले आहे की ते या वयातही कोणाशीही स्पर्धा करूशकतील. अनिल त्यांच्या फिटनेसचे श्रेय संतुलित आहार, कठोर परिश्रम आणि सकारात्मकतेला देतात. -
अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा इंडस्ट्रीतील एक असा अभिनेता आहे जो कोणत्याही परिस्थितीत त्याच्या ठराविक दिनचर्येचे पालन करतो, याच कारणामुळे अक्षय पन्नाशी ओलांडूनही त्याच्या तरुणपणीसारखाच तंदुरुस्त आहे. अक्षय कुमार टिनसेल टाऊनमधील सर्वात फिट पुरुषांपैकी एक आहे. कठोर दिनचर्या, निरोगी आहार, चांगली झोप आणि वाईट सवयी नसल्यामुळेच अक्षय वयाच्या 50 व्या वर्षी अकल्पनीय तंदुरुस्त दिसतो. चित्रपटांमध्ये तो शक्य होईल तेवढे स्वतःचे स्टंट स्वतः करतो. -
जॅकी श्रॉफ
अभिनेता जॅकी श्रॉफचा फिटनेस पाहून हा अभिनेता 60 वर्षांचा आहे यावर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. ज्या प्रकारे अभिनेत्याने स्वतःला सांभाळले आहे, त्यामुळे ते अजूनही खूप तरुण आणि आकर्षक दिसतात. चित्रपटांमध्ये त्यांचा विशेष अभिनय आजही आश्चर्यकारक आहे. त्यांनी नेहमीच त्यांच्या डॅपर लूकने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे. -
सुनील शेट्टी
अभिनेता सुनिल शेट्टीला भारताचा अर्नोल्ड श्वार्झनेगर म्हटले जाते. त्याच्या अभिनय कौशल्याची तुलना नेहमीच लाकडी ठोकळ्याशी केली गेली आहे. पण हे नाकारता येत नाही की जेव्हा तुम्ही 90 च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे बघता, तेव्हा तुम्ही ते सुनील शेट्टीशिवाय पाहू शकत नाही. सुनील शेट्टी अजूनही बॉलिवूडच्या इतर तरुण कलाकारांप्रमाणेच फिट आहे. तो अजूनही तितकाच तंदुरुस्त दिसतो. -
मिलिंद सोमण
मिलिंद सोमण एक असा बॉलिवूड अभिनेता आहे जो 52 वर्षांचा आहे आणि पांढऱ्या दाढीतही हॉट दिसतो. मिलिंद सोमण केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. मिलिंद सोशल मीडियावर खूप ऍक्टीव्ह असतो आणि तो अनेकदा त्याचे फिटनेस व्हिडीओ आणि फोटो त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करतो, यामुळे तो बऱ्याच लोकांसाठी फिटनेस प्रेरणापेक्षा कमी नाही. -
सलमान खान
आपल्या रॉक-हार्ड एब्स आणि अतुलनीय करिष्म्यासह, सल्लू भाई अर्थात सलमान खान देशातील सर्वात प्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. वयाच्या 52 व्या वर्षीही त्याने स्वत: ला इतके फिट ठेवले आहे की त्याच्याकडे पाहून त्याच्या वयाचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. आजही सलमानचे चाहते सलमानला शर्टलेस पाहण्यासाठी आणि सलमानला गुंडांची धुलाई करताना पाहण्यासाठी ऑनस्क्रीन जातात. -
शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग आणि रोमान्स किंग अशी ओळख असणारा शाहरुख खान त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. किंग खानने आपल्या फिल्मी कारकिर्दीत नेहमीच आपले शरीर सांभाळले आहे. शाहरुख खान कधीही बॉडीबिल्डर प्रकारचा अभिनेता नव्हता, परंतु त्याने ‘ओम शांती ओम’ मधील आपल्या सेक्सी सिक्स-पॅक ऍब्जने सर्वांच्या हृदयाची धडधड वाढवली होती.
-अमीर खान
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान नेहमीच काहीतरी वेगळे करतो आणि आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी रोमांचक आणतो. त्याने नेहमीच आपल्या कामाद्वारे प्रेक्षकांना चकित केले आहे. त्याला ‘गजनी’मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्यास 9 महिने लागले. आपल्या प्रत्येक पात्राला जिवंतपणा देण्यासाठी, अमीर त्याच्या शरीरावर प्रयोग करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत राहतो. आमिरचा फिटनेस हादेखील चर्चेचा विषय बनतो.