पुणे- कंपनीमध्ये किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन ही संघटनेच्या 13 पदाधिकाऱ्यांविरुध्द कोथरुड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीच्या एमआरचाही समावेश आहे.
यातील फिर्यादी प्रमोद पाटे (48, रा.सिंहगड रस्ता) हे कमिन्स इंडिया लिमिटेड कोथरुड येथे नोकरीस असून त्यांचे कंपनीमध्ये किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन ही संघटना आहे. सदर कर्मचा-यांसाठी सारस्वत को. ऑप बॅंक कमिन्स इंडिया लिमिटेड समोर कोथरुड शाखा यांच्या सहकार्याने ग्रुप लोन स्किम चालु असून कामगाराने घेतलेल्या कर्जाचे हप्ते चुकविल्यास त्या कामगाराच्या वेतनातून रक्कम काढून बॅंकेला देणार अशी लिखीत हमी कंपनीने बॅंकेला दिली होती.
कामगारांनी घेतलेल्या कर्जाची संपुर्ण वसूलीची जबाबदारी युनियनने घेतली असताना कर्जदार व अजित चंद्रकांत शेलार यांनी सारस्वत बॅंकेकडून 2 लाख रुपये ग्रुप लोन स्किम अंतर्गत कर्ज घेतले असून त्यास फि व साक्षीदार विलास बडदे हे दोघेजण जामीनदार असुन सन 2005 साली किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनचे नमुद पदाधिकारी यांनी संगनमत करुन शेलार यांना कंपनीतून काढून टाकल्यानं त्यांना कंपनीतून मिळणा-या ग्रॅच्युटीची तसेच इतर रक्कम त्यांचे सारस्वत बॅंकेचे ग्रुन लोन स्किमचे थकित कर्ज न कट करता व त्याच्या सारस्वत बॅंकेच्या खात्यावर जमा न केल्याने आ क्र यांचे कर्ज परतफेड न झाल्याने फिर्यादी यांचे सहकारी बॅंकेतील पगार खाते ब्लॉक करुन फिर्यादी व साक्षीदार यांना प्रत्येकी 67 हजार 500 रुपये शेलार यांचे कर्जाची थकित रक्कम भरण्यास लावून फिर्यादी यांना विश्वासात न घेता फसवणुक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी शेलार यांनी न्यायालयात दाद मागितल्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.