पुणे- पुण्यातील शाळा व महाविद्यालयांना चारचाकी वाहने भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून एकाची स्पॉर्पिओ परस्पर विकण्यात आली. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी राहुल शिवाजी ढेरे(30,रा.आळंदी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संग्राम नाईक (उंड्री) व युवरा गोसावी( 34,रा.भिवंडी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींनी ढेरे यांची स्कॉर्पिओ शाळा व महाविद्यालयात भाड्याने लावतो असे सांगत त्यांच्यासोबत स्टॅंप पेपरवर संमंतीपत्र तयार करुन घेतले. यानंतर त्यांची गाडी परस्पर अकलुज येथे विकली. तसेच त्यांचे मित्र सचिन होणाळकर यांची मारुती सियाज ही कारही कोणालातरी परस्पर विकल्याचा संशय आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक थोरबोले करत आहेत.