शिरूर – करोनाचा आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरूर येथील जिमच्या वतीने वीटभट्टी कामगारांमध्ये जनजागृती करण्यात आली. शिरूर शहरातील कुंभारआळी, ढोरआळी, हळद मोहोलला, मुंबई बाजार, बुरूडआळी, वीट भट्टी या भागात घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी विशेषतः वीटभट्टी कामगार व परिसरातील अशिक्षित नागरिक की जे ुहरींरर वि फेसबुक आशा माध्यमांपासून दूर आहेत, आशा नागरिकांना घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली.
यावेळी मोरया जिमचे बंटी जोगदंड, विशाल जाधव, विकास शितकल, सौरभ ढोबळे, अतुल निमोंनकर, अनिकेत केळगंद्रे, यश जामदार, विकास जामदार, आकाश जामदार, शुभम जामदार, तेजस जामदार आदी कार्यकर्त्यांनी जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
यावेळी मोरया जिम प्रमुख योगेश जामदार यांनी तळागाळातील प्रत्येक शिक्षित व अशिक्षित नागरिकाला करोनाबाबत माहिती देऊन त्याचा बचावाची उपाय पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे