बारामती (प्रतिनिधी) – बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय तूर व हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. हंगाम 2023-24 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने तूर व हरभरासाठी ऑनलाइन नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू झाली असून खरेदी कालावधीला 25 जूनपर्यंतची मुदत आहे. नोंदणी झालेल्या शेतकर्यांची तूर प्रतिक्विटल 7000 व हरभरा प्रतिक्विंटल 5440 ने खरेदी करण्यात येणार आहे.
सध्या नवीन हंगाम सुरू झाल्याने बाजारात तूर व हरभरा आवक सुरू झाली आहे. बारामतीमध्ये शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाले असून शेतकर्यांनी खरेदी केंद्रावर मुदतीत नाव नोंदणी करून खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा, असे आवाहन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार आणि उपसभापती निलेश लडकत यांनी केले आहे.
शेतकर्यांनी नाव नोंदणीसाठी तूर व हरभरा पिकाची नोंद असलेल्या चालू 7/12 उतारा (पिकपेरा), आधारकार्डची छायांकित प्रत व चालू बँक खाते अचूक तपशिलासह झेरॉक्स, मोवाइल क्रमांक तसेच आवश्यक कागदपत्रे आणि एकापेक्षा जास्त बँक खातेकरिता एकाच शेतकर्यांची नोंद करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तूर व हरभरा उत्पादक शेतकर्यांनी नीरा कालवा संघ येथे प्रथम ऑनलाइन नाव नोंदणी करावी. खरेदी सुरू झाल्यानंतर नोंद