आळंदी – येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापन शास्त्र (एमबीए) महाविद्यालय, डूडूळगाव, आळंदी येथे संचालक या पदावर कार्यरत असलेले प्रा. धनंजय बागुल यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय पीएचडी प्रदान केली आहे.
बागुल यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत, अ स्टडी ऑफ डमिनिस्ट्रेटीव्ह पॉलिसीज फॉलोड इन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल युनिटस इन वेस्टर्न रिजन ऑफ महाराष्ट्र या विषयात त्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले आहे. अबेदा इनामदार सिनियर कॉलेज, पुणे डॉ. एम. जी. मुल्ला यांनी त्यांना मार्गदर्शन केले.